संतापजनक !, हुंड्यासाठी गर्भवती महिलेला जिवंत पेटवलं

June 5, 2016 3:09 PM0 commentsViews:

गोंदिया – 05 जून : हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून सासरच्या लोकांनी एका गर्भवती महिलेला जिवंत जाळल्याची संतापजनक घटना घडलीये. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर प्रकरण दडपण्यासाठी मुलीच्या माहेरी न कळवता तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. माहेरच्या लोकांनी पाठपुरावा केली म्हणून पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आणि मृत महिलेच्या पतीला आणि सासर्‍याला अटक केली.

dowryगोंदियाच्या गौशाला वार्डात राहणार्‍या मोहन भाई पटेल यांची मुलगी भूमिका पटेल हिचे प्रेम सुत ह्याच भागात राहणार्‍या आकाश पुरोहित या तरुणाशी जुळले. आणि भूमिकाने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ऑगस्ट 2015 मध्ये आकाशसोबत मंदिरात जाऊन लग्न केलं. सुरुवातीला सगळं काही बरोबर चाललं पण लग्नाच्या थोड्याच दिवसानंतर सासरच्या लोकांचा नवीन चेहरासमोर दिसून आला आणि भूमिकाकडे हुंड्याची मागणी होऊ लागली. भूमिकाच्या सासरच्या लोकांची हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून तिला जिवंत जाळून टाकण्याचा आरोप भूमिकाच्या आई वडिलांनी केला आहे. एवढंच नाहीतर भूमिका मृत पावली याची माहितीही माहेरच्या लोकांशी लपवून ठेवली आणि प्रकरण तापेल म्हणून पुरोहित कुटुंबियांनी भूमिकाचा अंत्यविधी तिच्या घरच्या लोकांना न सागता करून टाकला

पटेल कुटुंबीय भूमिकाच्या हत्येसंदर्भात गोंदिया शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेले असता पटेल कुटुंबाला पोलिसांकडून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कुटुंबाच्या वाढत्या दबावाखाली अखेर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून सासरे संतोष पुरोहित आणि पती आकाश पुरोहित याला अटक केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा