मान्सूनपूर्व पावसातच बंधारा गेला वाहून, दीड कोटींचा चुराडा

June 5, 2016 7:55 PM0 commentsViews:

कोल्हापूर – 05 जून : राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारी कोल्हापुरातही चांगलाच पाऊस पडला. या मान्सूनपूर्व पावसानं कृषी विभागाचा बंधाराच वाहून गेलाय. दीड ते दोन कोटी खर्चून खमलेहट्टी इथं हा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र पाणी साठवण्यार्‍या बंधार्‍याचा एकाच पावसात बोजवारा उडाला. आणि पालिकेचं निकृष्ट दर्जाचं काम दिसून आलं असून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलांय.kolhapur3

हे आहेत गडहिंग्लज मधील पाणलोट बंधारे. या बंधार्‍यांच्या कामात कशी गडबड झालेय हे दाखवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वतः या कामांचा कागदपत्रानिशी पंचनामा करताहेत. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.

या कामांची चौकशी होऊन कारवाई न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय.

या संपूर्ण प्रकाराबाबत कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना विचारल्यानंतर त्यांनी एका ठेकदाराला दंड केलाय आणि पुढील कारवाई सुरू असल्याच सांगितलंय.

मात्र, हा प्रकार म्हणजे सरकारी पैशांचा निव्वळ बाष्कळ वापर असुन, एक मोठी यंत्रणाच पाणी न अडण्यासाठी कार्यरत असल्याचं दिसतंय. आत्ता प्रश्न उरतो तो या सगळ्यांवर कारवाई कधी होणार ?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा