समता बँकेच्या ठेवीदारांचे धरणे

March 30, 2010 11:46 AM0 commentsViews: 1

30 मार्च नागपूरच्या समता सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने समता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे येथील ठेवीदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या बँकेचे विलिनीकरण करण्यात यावे, तसेच दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी या ठेवीदारांची मागणी आहे. यासाठीच बँकेच्या कर्मचार्‍यांनी आणि ठेवीदारांनी नागपूरच्या रिझर्व्ह बँकेसमोर धरणे धरले. 68 हजार ठेवीदार आणि 145 कोटी रूपये ठेवी असलेल्या समता सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे.

close