हायकोर्टाने फेटाळली सुशील कुमारची याचिका, नरसिंह जाणार रिओ ऑलिम्पिकला

June 6, 2016 5:34 PM0 commentsViews:

Sushil kumar213

06 जून :  कुस्तीपटू सुशीलकुमार याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने रिओ ऑलिंपिकमधील नरसिंग यादवचा सहभाग आता निश्चित झाला आहे.

जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक पटकावून नरसिंगने 74 किलो वजनी गटात भारताला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला. मात्र, आपला पूर्वनियोजित 66 किलो वजनी गट रद्द झाल्याने सुशीलने 74 किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुस्ती महासंघाने नरसिंगच्याच पारड्यात मत टाकले होते.

या पार्श्वभूमीवर सुशीलकुमारने न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावताना कुस्ती महासंघाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे आता नरसिंग यादव हाच रिओ ऑलिंपिकमध्ये खेळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा