कन्हैयावर हल्ला करणार्‍या मानस डेकाचा अमित शहांसोबतचा सेल्फी व्हायरल

June 6, 2016 3:25 PM0 commentsViews:

manas-deka-759

06 जून :  कन्हैयाकुमारवर हल्ला केल्याचा आरोपी असलेला मानस डेकाने काल (रविवारी) खुद्द भाजपाध्यक्षांसोबत सेल्फी काढला. त्यामुळे भाजपने संबंध नाकारलेला मानस पक्षाशी संबंधित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेला कन्हैया कुमारवर मुंबई-पुणे प्रवासावेळी मानसने धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. यावेळी मानस हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. पण आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचा उलट दावा मानसनेच केला होता.

आसामधल्या विजयाबद्दल रविवारी पुण्यातील आसामी नागरिकांच्या वतीने शहांचा सत्कार करण्यात आला. त्याच कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मानस थेट गुवाहाटीवरून आसामला आला होता. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत मानसने सेल्फी काढल्यानं तो पुन्हा चर्चेत आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा