चाहूल मान्सूनची, येत्या 48 तासात केरळात होणार दाखल

June 6, 2016 10:02 PM0 commentsViews:

rain inkerla213

06 जून : शेतकर्‍यांसह सर्वांचे आता आकाशाकडे डोळे लागले आहेत. दुष्काळ आणि पाणीटंचाईने हैराण झालेले शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात आहेत. मान्सून कोणत्याही क्षणी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढच्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दरम्यान, आज दिवसभर राज्यातील बहुतेक ठिकाणी पावसाचे वातावरण होते. तर पुढील काही तासात अमरावती, बुलडाणा, नागपूर, नांदेडच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा