मुंबईचा मुकाबला पंजाबशी

March 30, 2010 11:59 AM0 commentsViews: 2

30 मार्चआज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मुकाबला असेल तो किंग्ज इलेव्हन पंजाबशी. मुंबईची टीम यावर्षी तुफान फॉर्ममध्ये आहे. तर पंजाबला अजूनही सूर सापडायचा आहे. त्यामुळे आजची मॅच पंजाबसाठी 'करो या मरो'ची असणार आहे.आयपीएल सीझन 3 मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन अनेक समस्यांशी झगडत आहे. गेल्या 6 मॅचमध्ये त्यांना 5 पराभव पत्करावे लागलेत. तर त्यांचे स्टार्स फ्लॉप ठरलेत. आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार्‍या मॅचमध्ये पंजाबचा मुकाबला असेल तो इन फॉर्म मुंबई इंडियन्सशी. त्यामुळे त्यांचा प्रभारी कॅप्टन महेला जयवर्धने तरी काही जादू करु शकतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल पाच विजय आणि फक्त एका पराभवामुळे मंुबई इंडियन्स सध्या टॉपवर आहेत. कॅप्टन सचिन तेंडुलकर तुफान फॉर्मात आहे. तर संपूर्ण टीमचा त्याला जबर पाठिंबा आहे. त्यामुळे याही मॅचमध्ये विजयी कामगिरी करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे पहिल्या दोन आयपीएलमध्ये पंजाबचे पारडे जड होते. मुंबईविरुध्द आत्तापर्यंत खेळलेल्या 4 मॅचपैकी पंजाबने 3 मॅच जिंकल्या आहेत. पण त्यांना तीच कमाल करता येते का, की आज मुंबई बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

close