अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाकडून हिलरी क्लिटन यांची उमेदवारी निश्चित

June 7, 2016 12:50 PM0 commentsViews:

hillary-clinton12

07 जून :   राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

अटीतटीच्या वाटणार्‍या लढतीत हिलरी क्लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांचा पराभव केला आहे. उमेदवारी मिळण्यासाठी 2,383 प्रतिनिधींच्या मतांची आवश्यकता होती. ती मते हिलरी यांनी मिळवली.

इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत डेमोक्रेटिक पक्षातर्फे एक महिला उमेदवार उभी राहणार आहे. त्यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांच्यासोबत होईल.

त्यामुळे येत्या नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनल्ह ट्रम्प बाजी मारणार की हिलरी क्लिंटन याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा