अखेर केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात दिशेने प्रवास सुरू

June 7, 2016 2:15 PM0 commentsViews:

monsoon_rain

केरळ -07 जून :  प्रंचड उकाड्याने त्रस्त झालेल्यांसाठी सर्व देशवासीयांसाठी एक आनदांची बातमी आहे. ज्याची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे.

सोमवारी रात्री तिरुवनंतपुरम इथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

येत्या 48 तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल. तुरळक ठिकाणी गडगडाटासह वादळी पावसाचाही अंदाज आहे.

दरम्यान, मान्सून 7 जून रोजी केरळ किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता. त्यानुसार आजपासून केरळात पावसाला सुरूवात झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा