पोलीस दाम्पत्याने एव्हरेस्ट सर करून रचला इतिहास

June 7, 2016 3:14 PM0 commentsViews:

Everest couple »ÖÖîê

07 जून :  महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या राठोड दाम्पत्याने आज (मंगळवारी) एक नवा इतिहास रचला आहे. ते माऊंट एव्हरेस्ट सर करणारं पहिलं भारतीय पोलीस दाम्पत्य ठरलं आहे.

महाराष्ट्र पोलिसात असलेल्या तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड यांनी सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं. दोघंही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.

राठोड दाम्पत्याने 23 मे रोजी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत सर केला. पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून माऊण्ट एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले भारतीय दाम्पत्य आणि पोलीस कर्मचारी जोडी बनली आहेत. या कामगिरीमुळे त्यांनी भारतासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

‘ऍडव्हेंचर कपल’ या नावाने प्रसिद्ध असणारे राठोड दाम्पत्य 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघं 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एकत्र एव्हरेस्ट शिखर गाठण्याचं त्यांचं स्वप्न होतं. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती.

या 30 वर्षीय जोडप्याने ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखरावरही त्यांनी यशस्वीपणे पाऊल ठेवलं असून स्काय डायव्हिंग सारख्या काही खेळातही ते सहभागी झाले आहेत. राठोड दाम्पत्याला साहसी खेळांची आवड आहे. सन 2015 मध्ये नेपाळ भूकंपामुळे अपूर्ण राहिलेले एव्हरेस्ट चढाईचे त्यांचे स्वप्न यावर्षी पूर्ण झाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील एका पोलिसाने एव्हरेस्ट सर केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या नव्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा