गुरुदास कामतांच्या घरासमोर समर्थकांची घोषणाबाजी

June 7, 2016 7:09 PM0 commentsViews:

07  जून : राजकारण आणि काँग्रेस पक्षातून संन्यास घेतलेले काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या घरासमोर आज काँग्रेस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Congress

मुंबईत काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणणार्‍या नेत्याचा राजकारणात अशा प्रकारे शेवट होणं योग्य नसल्याचं म्हणत, कार्यकर्त्यांनी याबाबत पक्षनेतृत्वाला लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, आपण राजकारणातून संन्यास घेतला असला तरीही सामाजिक कार्यात पक्षाला आपली गरज लागत असेल, तर आपण मदत करायला तयार असल्याचं कामत यांनी स्पष्ट केलं आहे. पण आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता कामतांचं संन्यास घेणं पक्षासाठी योग्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा