बोपखेलचा तरंगता पूल अखेर लष्कराने काढला

June 7, 2016 4:57 PM0 commentsViews:

Bopkhel bridge

07 जून :  पुण्यातील बोपखेल आणि बोपुडी परिसराला जोडणारा नदी पत्रातील तरंगता पूल लष्कराने आज अखेर काढून टाकला आहे. पावसाळ्यात या पुलावरून ये-जा करणं धोक्याचं असल्यामुळे लष्कराने हा पूल हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने बोपखेलच्या वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्यादृष्टीने अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्याअभावी ग्रामस्थांची कोंडी झाली असून, महापालिका कोणती पर्यायी व्यवस्था करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लष्कराने मुळा नदीवर तरंगता पूल उभारून बोपखेल ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध करून दिला होता. पावसाळ्यात तरंगता पूल वाहून जाणार या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल लष्काराने काढून टाकला आहे. हा पूल बंद झाल्यामुळे बोपखेलच्या रहिवाशांना नेहमीच्या कामासाठी जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. आता तत्काळ पर्यायी पुल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा