मुख्यमंत्र्यांमुळेच ‘ऑपरेशन’ यशस्वी, सेनेचा मुख्यमंत्र्यांना शाब्दिक चिमटा

June 7, 2016 9:38 PM0 commentsViews:

CM Cabinet21

07  जून : महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी राजीनमा दिल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याचा टोमणा शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

त्यानंतर इतर मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांनी चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. दरम्यान, विषय भरकटत असल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांनीच विषय बदलण्याची विनंती केली. मात्र, खडसेंशिवाय झालेली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गप्पा, चिमटे आणि टोमणे जास्त असल्यानं ही बैठक सर्वांच्याच लक्षात राहील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा