बेळगावच्या महापौरपदी एन. बी. निर्वानी बिनविरोध

March 30, 2010 1:25 PM0 commentsViews: 1

30 मार्चबेळगावमध्ये आज महापौरपदाची निवडणूक पार पडली. एन. बी. निर्वानी यांची महापौरपदी निवड करण्यात आली. कन्नड भाषिक महापौरांची यावेळी बिनविरोध निवड झाली. पण या निवडीवरून सभागृहात काही नगरसेवकांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे उपमहापौर आणि स्थायी समिती निवडणूक एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे.मराठीची गळचेपी बेळगावात महापौर निवडणुकीसाठी मराठीची गळचेपी होत आहे. महापौरपदासाठी फक्त कन्नड भाषिकांचा अर्ज वैध ठरवल्याने आज गोंधळ झाला. भाजपचे आमदार अभय पाटील यांनी विद्यमान महापौर यल्लापा कुरबर आणि महापालिका आयुक्त एस. जी. पाटील यांना हाताशी धरून निवडणूक प्रक्रियेत जाणून बुजून घोटाळा केला. त्यांनी मराठी आणि इतर भाषिक उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरवले. त्यामुळे अभय पाटील यांच्या जवळचे समजले जाणारे एन. बी. निर्वाणी या कन्नड भाषिक उमेदवाराला महापौरपद मिळाले. दरम्यान 58 पैकी 40 नगरसेवकांनी याविरोधात सभागृहात ठाण मांडले.

close