एक्स्प्रेस-वे अतिवेगात गाडी चालवणार्‍यांवर होणार कडक कारवाई – मुख्यमंत्री

June 7, 2016 5:41 PM0 commentsViews:

Mumbai- Pune Expressway

07  जून : एक्स्प्रेस वेवर अतिवेगवान गाड्या चालवणार्‍यांवर आता कडक कारवाई होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असल्याची महितीही त्यांनी दिली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात, 17 जणांचा बळी गेला. त्यामुळे हा मार्ग नागरीकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सतत होणार्‍या अपघातामुळे त्याची गांभीर्याने दखल घेत, वाढत्या अपघाता संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री अपघातामागची कारणं जाणून घेतली. तसंच अपघात कमी करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एवढचं नाही तर उपाययोजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरव्यात, असं देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना खडसावले आहे. यापुढे लेन कोण मोडताय, गाडीचा वेग किती आहे ? विशेष नियंत्रण कक्षेमुळे ओळखता येईल. तसंच दोन टोल बुथमधील अंतर चालकाने किती वेळात कापले हे ही यापुढे तपासलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा