केरळात 9 जूनला धडकणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

June 7, 2016 10:19 PM0 commentsViews:

keralarains

07  जून :  पुढील 48 तासांत मॉन्सून केरळच्या किनार्‍यावर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे.

मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या 3 ते 4 दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल. यंदा दुष्काळ स्थितीत होरपळून निघालेले नागरिक पावसाची अतूरतेने वाट पाहत असताना 9 जूनपर्यंत केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचे संचालक बालचंद्रन वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला असून, लवकरच मॉन्सूनही दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या शुक्रवारपर्यंत वादळी वार्‍यासह पाऊस पडेल, असंही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पूर्वमोसमी वार्‍याच्या सरी पडत आहेत. ढगाळ हवामान, पाऊस यामुळे राज्यातील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भातही उष्णतेची लाट ओसरली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा