मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू

June 8, 2016 9:32 AM0 commentsViews:

wall collapse12

08  जून  : मुंबईच्या माटुंगामध्ये काल (मंगळवारी) रात्री तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. माटुंगा मार्केट ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीचा स्लॅब कोसळला असून मृतांमध्ये दोन पुरुषांचा समावेश आहे.

दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा हटवला. जवानांनी ढिगार्‍याखाली दोन मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.

पोलिस आणि अग्निशमन दलाचं पथक स्लॅब दुर्घटनेची चौकशी करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा