रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे

June 7, 2016 2:33 PM0 commentsViews:

rbi_new2

07  जून : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नव्या आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक पत धोरण आज जाहीर केले. यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

रिव्हर्स रेपो रेट 6 टक्क्यांवर आणि रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय कॅश रिझर्व्ह रेशोही तसाच ठेवण्यात आला आहे. भविष्यात खजिन तेलाचे भाव अन् पर्यायाने महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राजन यांनी व्याजदरात कपात केली नसल्याचे अर्थविषयक अभ्यासकांचे म्हणणे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा