डोंबिवली स्फोटाप्रकरणी अधिकार्‍याने दारू पिऊनच केला सर्वे

June 8, 2016 10:03 AM0 commentsViews:

Dombivli213

08  जून  : 2 आठवड्यांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात आसपासच्या परिसरातील अनेक इमारतींचं नुकसान झालं. या इमारतींचा, घरांचा, दुकानांच्या सर्व्हे करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडूनविशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र या पथकातील अधिकारी कमलाकर पाटील हे दारू प्यायल्याचे निदर्शनास आलं. ही बाबत लक्षात येताच नागरिकांनी त्याला जाब विचारला.

मात्र, अधिकार्‍याने नागरिकांना उद्धटपणे उत्तरे देत हुज्जत घातली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी एकच गोंधळ घालत अधिकार्‍यांना घेराव घातला.

गर्दी वाढत गेल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या अधिकार्‍याला ताब्यात घेतलं आणि त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. संतापलेल्या नागरिकांनी या अधिकार्‍याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी वैदकीय अहवालात कमलाकर पाटील याने मद्य प्राशन केल्याचं सिद्ध झालं.

दरम्यान अद्यापही या अधिकार्‍यावर किंवा त्याच्या साथिदारांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा