प्रतीक्षा संपली… अखेर मान्सून केरळच्या किनार्‍यावर दाखल

June 8, 2016 1:17 PM0 commentsViews:

rain-1

08  जून : संपूर्ण देश चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला मान्सूनचा पाऊस अखेर आज (बुधवारी) केरळच्या किनार्‍यावर दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) याबाबतची माहिती दिली आहे.

मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या 48 तासात मान्सून दाखल होणार असल्याचं आंदज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण, आजच मान्सूनच्या केरळच्या किनार्‍यावर दाखल झाला असून, त्रिवेंद्रमसह केरळमध्ये जोरदार पाऊस होत आहे.

दरम्यान, साधारणतहा मान्सून केरळमध्ये पोहोचल्यानंतर आठवडयाभराने महाराष्ट्रात पोहोचतो. हवामान अनुकूल राहिले तर, पुढच्या आठवडयाभरात मान्सून गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यने वर्तवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा