NSG आणि MTCR सदस्यत्वासाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा

June 8, 2016 11:49 AM0 commentsViews:

India America123

08  जून  :  अमेरिकेच्या समर्थनामुळे भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला नियंत्रण करणार्‍या संस्थेच्या (MTCR) सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप (NSG) अर्थात आण्विक पुरवठा करणार्‍या देशांची यादीत भारताचा समावेश निश्चित मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काल झोलेल्या बैठकीनंतर ओबामांनी भारताला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. भारताच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. दोन्ही नेत्यांनी काल तासभर चर्चा केली आणि नंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. त्याचबरोबर भारतात सहा अणुभट्‌ट्या उभारण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि प्रसारावर नियंत्रण ठेवणार्‍या MTCR या गटात भारताचा समावेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळं भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातली नवी टेक्नॉलॉजी मिळणार आहे. तसंच भारताकडे असलेलं तंत्रज्ञान विकताही येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा