अच्छे दिन कुठे?, राज्यात तर निजामांच्या बापाचं राज्य-संजय राऊत

June 8, 2016 10:53 PM1 commentViews:

औरंगाबाद – 08 जून : राज्यात अच्छे दिन कुठे आहेत ?, राज्यात तर निजामांच्या बापाचे राज्य सुरू आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलीये. तसंच भाजपच्याच दोन चार लोकांसाठी अच्छे दिन असतील आणि ते कसे आले असतील ते खडसेंना विचारा असा टोलाही राऊत यांनी लगावला. ते औरंगाबादेत बोलत होते.sanjay_raut_on_bjp

औरंगाबादेत शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. राज्यात अच्छे दिन कुठे आहेत. राज्यात तर निजामांच्या बापाचे राज्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला. पण, ज्या ज्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पंतप्रधान कधी फ्रान्सला, तर कधी इराणला, तर कधी लंडनला आहेत असं कळलं. गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधानांना मराठवाड्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मागणी करतोय. पण ते आतापर्यंत आले नाही त्यामुळे इथं निजामांच्या बापाचं राज्य सुरू आहे अशी विखारी टीका राऊत यांनी केली. तसंच आम्ही भाजपसोबत सत्तेत असूनही विरोधीपक्षाची भूमिका पार पाडत आहोत. कारण, आम्ही जनतेसाठी काम करतो उद्योगपतींसाठी नाही. आता निवडणुका घ्या बघा आमचे राज्य येते की नाही असं आव्हानच राऊत यांनी भाजपला दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vishwas Kadam

    If you do not find Acchhe Din With BJP .Why the hell you are with them ? I am Shivsaink from 1966,I really feel that we are missing “SAHEB” ,Bole tayasa Chale Tyachi vandavi Pawoule”
    B S Kadam