लॉटरी संचालनालयावर भ्रष्टाचाराचा आरोप

March 30, 2010 2:18 PM0 commentsViews: 7

30 मार्चराज्यात ऑनलाइन लॉटरीचे पेव फुटले आहे. या लॉटरीच्या माध्यमातून राज्यसरकारचा महसूल बुडतोय, अशी ओरड नेहमीच केली जाते. पण आता लॉटरी कंपन्यांना हाताशी धरुन लॉटरी संचालनालयाने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने विधानसभेत केला आहे. ऑनलाइन लॉटरीचा एक ड्रॉ काढण्यासाठी सरकार दफ्तरी 50 हजार रुपयांची फी जमा करावी लागते. पण काही लॉटरी कंपन्यांनी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या ऑनलाइन लॉटरीच्या एका ड्रॉमध्ये नऊ गेम दाखवून आठ ड्रॉची फी बुडवल्याची माहिती उघडकीस आली आहे.

close