महिलांनी ओढला हनुमान रथ

March 30, 2010 2:26 PM0 commentsViews: 2

30 मार्चआज राज्यात सर्वत्र हनुमान जयंती साजरी केली जात आहे. संगमनेरमधे मात्र एक अनोखी प्रथा आहे. इथे महिला हनुमानाचा रथ ओढतात. सण उत्सवाला इंग्रजांनी बंदी घातली होती. या बंदीला न जुमानता संगमनेरमध्ये एका महिलेने हनुमानाचा रथ ओढून ब्रिटीश पोलिसांना चपराक दिली होती. त्या घटनेची आठवण म्हणून आजही संगमनेरमध्ये हनुमान जयंतीचा रथ येथील महिला ओढतात. 1929मध्ये ब्रिटीश सरकारने संगमनेरमधील हनुमान जयंतीचा रथ काढण्यास पुरूषांना मज्जाव केला होता. त्यावेळी झुंबराबाई औसक या महिलेने इतर महिलांना एकत्र करून रथ ओढण्याचा निर्णय घेतला. आणि रथाची मिरवणूक गावभर काढली. हीच प्रथा आता येथील महिला पुढे चालवत आहेत. या रथावर लावण्यात येणारा ध्वज पोलीस सवाद्य मिरवणुकीने आणून रथावर लावतात. त्यानंतर सर्व जातीधर्माच्या महिला हा रथ ओढतात.

close