109 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बीडच्या मीना तुपे ‘बेस्ट वुमेन कॅडेट’

June 8, 2016 7:42 PM0 commentsViews:

09 जून : नाशिकमध्ये पोलीस दलाच्या 113 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ दिमाखात पार पाडला. या तुकडीतून 749 पोलीस अधिकारी सेवेत दाखल होणार आहे. पहिल्यांदाच स्वार्ड ऑफ ऑनर हा किताब एका महिलेच्या नावे जमा झालाय. मीना भीमसिंग तुपे यांना हा किताब प्रदान करण्यात आला. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या 109 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला प्रक्षिणार्थीचा सन्मान मिळालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 503 पुरुष उपनिरीक्षक आणि 246 महिला अधिकारी पोलीस सेवेत दाखल झाले आहे.meena_tupe

बीड जिल्ह्यातील कामखेडा गावातील मीना भावसेन तुपे हिला सर्वोत्कृष्ठ वुमेन कॅडेटसह, सर्वोत्तम प्रक्षिणार्थी म्हणून मानाची तलवार देऊन गौरवण्यात आलं. मीना यांच्यासोबत प्रदीप लाड,धनाजी देवकर,दिपमाला जाधव,प्रशांत मुंडे,शुभांगी मगदुम आणी पूनम सूर्यवंशी यांना विशेष गुणवत्ता पुरस्कार देण्यात आलं. यंदाच्या बॅचमधील वैशिष्ठ्य म्हणजे महिलांचा स्पष्ट दिसून आलेला दबदबा.

2010 ला पोलीस दलात शिपाई म्हणून दाखल झालेल्या मीना तुपे यांनी खंडाळ्यातील प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ठ पुरस्कार प्राप्त केला होता. तिनं जिद्दीनं 2013 ला एमपीएससी परिक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणात पुन्हा एकदा मानाचा किताब मिळवला आहे. दुष्काळानं होरपळलेल्या बीड जिल्ह्यातील कामखेडा या लहानश्या गावातील या शेतकर्‍याच्या मुलीनं केलेल्या या विक्रमानं 109 वर्षांचा इतिहास मोडित काढला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा