भारताच्या शेजारीच दहशतवाद्यांचा गड, पंतप्रधानांनी पाकला ठणकावलं

June 8, 2016 10:45 PM0 commentsViews:

08 जून : दहशतवादाची छाया जगभर पडली असली तरी भारताच्या शेजारीच दहशतवादाचा गड आहे आणि या दहशतवादाशी निपटून काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख न करत अमेरिकेच्या सिनेटमधून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या जोरदार भाषणाला सिनेटच्या सर्व सदस्यांनी उभं राहुन दाद दिली.

pm_modi_in_usते आले…त्यांनी पाहिलं..आणि त्यांनी जिंकलं…असंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल म्हणता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौर्‍यावर आहे. आजचा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासात नोंद घेणारा असाच ठरेलं. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये भाषण केलं. अमेरिकन सिनेटमध्ये भाषण करणारे नरेंद्र मोदी भारताचे सहावे पंतप्रधान ठरले आहे. पंतप्रधान मोंदींचं सिनेटच्या सभागृहात जेव्हा आगमन झालं तेव्हा सर्व सिनेट सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. व्यासपीठाकडे जात असताना पंतप्रधानांनी सिनेटच्या सदस्यांशी हस्तादोलन केलं. जवळपास पाच मिनिट टाळ्याचं गजर सुरू होता. जेव्हा मोदी व्यासपीठावर पोहचले तेव्हा त्यांच्या नावाची घोषणा ‘लोकशाहीच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी’ अशी करण्यात आली आणि पुन्हा एकदा सभागृह टाळ्यांच्या कडकडाट दणदणून गेलं.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील सिनेटच्या अमेरिकन काँग्रेस आणि सर्व सदस्यांचे आभार मानले. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून तो 125 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. मला भाषण करण्याची संधी देऊन जगभरातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आपण सन्मान केला आहात. एका लोकशाहीमुळे दुसरी लोकशाही सशक्त होते. विविधतेत एकता हे दोन्ही देशांचे समान सूत्र आहे. स्वातंत्र्य आणि समता हा दोन्ही देशांच्या लोकशाहींना जोडणारा समान धागा आहे. जसे तुमच्यासाठी होली बायबल हा हा ग्रंथ आहे तसंच आमच्यासाठी संविधान हेच ग्रंथ आहे अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबियात होते त्याबद्दलचा उल्लेख केला. पुढे त्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला. वाजपेयींनी सांगितलं होतं अमेरिका आणि भारत हे नैसर्गिक सहकारी आहे अशी आठवणही पंतप्रधानांनी काढली. अमेरिका आणि भारताला योगा हा जोडणारा दुवा आहे. असं म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणात योगा चाही उल्लेख केला. भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा अमेरिकेने दिलेला पाठिंबा भारत विसरू शकणार नाही.आमच्या दु:खात आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी अमेरिकेचे आभार मानले.

भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात मोदींनी दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आवाहन केलं. आज जगावर दहशतवादाची छाया आहे. आमच्यासमोर दहशतवाद आणि सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. पण, आमच्या शेजारीच दहशतवादाचा अड्डा आहे असं म्हणत पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलं. तसंच अशा दहशतवादी अड्‌ड्यांना मदत करू नये असं आवाहनही केलं. पंतप्रधानांचं भाषण संपल्यानंतर उपस्थितीत सदस्यांनी उभं राहुन टाळ्याच्या गजरात पंतप्रधानांच्या भाषणाला दाद दिली. एवढंच नाहीतर भाषण संपल्यानंतर पंतप्रधान जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरले तेव्हा सिनेटच्या सदस्यांनी हस्तादोलन करण्यासाठी गर्दी केली. काही सदस्यांनी त्यांचे स्वाक्षरी सुद्धा घेतली. पंतप्रधानांनी 45 मिनिटं भाषण केलं पण हे 45 मिनिटं आणि सभागृह फक्त पंतप्रधानांचं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा