आयपीएल टी शर्ट फिव्हर

March 30, 2010 2:48 PM0 commentsViews: 6

अमित मोडक, मुंबई30 मार्चआयपीएल फिव्हर आता जोर धरू लागला आहे. आयपीएल टीमचे टी-शर्टस, शूज, बॅट्सनी दुकाने सजू लागली आहेत. सध्या सर्वात जास्त मागणी आहे, ती मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या टी-शर्टस्‌ना…आयपीएल फिव्हर कॅश करण्यासाठी दुकाने सज्ज झाली आहेत. रिबॉक, ऍडिडाससारखी शो रुम्स आयपीएल टीमच्या किटनी सजली आहेत. तुम्ही KKR चे फॅन्स असाल तर रिबॉकमध्ये तुम्हाला नाईट रायडर्सची अख्खी किट मिळेल. फक्त टी- शर्टसाठी तुम्हाला मोजावे लागतील, तब्बल दोन हजार रुपये.जरा जास्त होतायत? तर मग फॅन टि-शर्टही आहे, फक्त 400 रुपयांमध्ये!तुम्ही मुंबई इंडियन्सचे फॅन्स असाल तर तुम्हाला ऍडिडासमध्ये जावे लागेल. फक्त मुंबई इंडियन्सची कीटच नाही, तरयांनी खास स्लीपर्सही आणलेत. मुंबईच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे, त्यांच्या टी शर्टची मागणीही वाढली आहे.फॅन्सना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी आणखी एक शक्कल लढवली आहे. तुम्ही घेतलेल्या टी-शर्टवर तुम्ही हवे तेनाव आणि नंबर टाकू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खिसा आणखी हलका करावा लागेल.पण आपल्या फेव्हरेट टीमलास्टेडियमध्ये जावून चिअर करण्यासाठी थोडा खर्च झाला तरी चलाता है….

close