क्रिकेटनंतर आता मान्सूनवरही सट्टेबाजार तेजीत, पावसाच्या अंदाजावर लागली 500 कोटींची बोली

June 9, 2016 11:39 AM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई

09 जून : आयपीएलच्या मॅचेसनंतर आता सट्टेबाजांचं लक्ष आहे मान्सूनवर. पावसाच्या एक एक थेंबावर सट्टा खेळला जात आहे. मुंबईत मान्सून कधी पोहोचणार, किती मिलीमीटर पाऊस पडणार यावर कोट्यावधींचा सट्टा लावला जातोय.

आतापर्यंत आपण ऐकलंय की सट्टेबाजांचं लक्ष असतं क्रिक्रेटच्या मॅचेसवर किंवा निवडणुकांवर. पण आता सट्टेबाजांच्या रडारवर मान्सूनही आहे, हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. एवढच नाही तर पावसावर जवळपास 500 कोटींचा सट्टा लावला गेला असल्याची माहिती खुद्द हवामान खात्यानं दिली आहे.

Satta rainq234

मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? यावर सट्टा कसा लागलाय, ते पाहा :

  • गुरुवारी 9 जूनला पाऊस पडला तर सट्‌ट्याचा दर 65 पैसे
  • शुक्रवारी 10 जूनला पाऊस आला तर सट्‌ट्याचा दर 45 पैसे
  • शनिवारी 11 जूनला पाऊस आला तर दर 50 पैसे
  • रविवारी 12 जूनला पाऊस येणार यावर सट्‌ट्याचा दर आहे 80 पैसे
  • जर पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवारी 12 जूनला पाऊस आला तर सट्‌ट्याचा दर आहे 1 रूपये 50 पैसे

केवळ पाऊस दाखल होण्याच्या तारखेवरच नाही तर पाऊस किती पडणार यावरही सट्टा लागला आहे.

  • अंदाजपेक्षा कमी पाऊस पडणार यावर 70 पैसे दर आहे
  • अंदाजानुसार पाऊस पडणार यावर 75 पैसे दर आहे
  • अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडणार यावर 60 दर आहे

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार या हवामान खात्याच्या अंदाजानं सर्वांना मोठा दिलासा मिळाला. पण सट्टेबाजांना मात्र या बातमीत कमाईचा नवा मार्ग शोधून काढला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा