संपत्तीसाठी आई वडिलांना साप सोडून मारले

March 30, 2010 2:59 PM0 commentsViews: 15

30 मार्चसंपत्तीसाठी माणूस कुठल्या थराला जावू शकेल हे सांगणे कठीण आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी इथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणार्‍या निर्भय बल्लेवार याने सर्पमित्राच्या मदतीने आपल्या आई वडिलांची विषारी साप सोडून हत्या केली आहे. माहूरला देव दर्शनाला निघालेल्या आपल्या आई वडिलांच्या कारमध्ये साप सोडला. या विषारी सापाने दंश केल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी निर्भय बल्लेवार, त्याचा ड्रायव्हर आणि दोन साथीदारांना अटक केली. निर्भयने सर्पमित्राला पाच लाख रूपयांची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

close