गुरुदास कामतांची काँग्रेस हायकमांडकडून मनधरणी ?

June 9, 2016 4:20 PM0 commentsViews:

kamat_vs_congressमुंबई – 09 जून : गुरूदास कामत यांचं बंड शमवण्यासाठी दिल्लीतून जोरदार प्रयत्न होत आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुरूदास कामत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संकेत काँग्रेसनं दिले आहेत.

गुरुदास कामत हे गुजरात आणि राजस्थान सारख्या महत्वांच्या राज्यांचे पक्षप्रभारी आहेत. मात्र त्याचा कार्यभार अजूनही कामतांकडेच ठेवण्यात आलाय. कामत हे गांधी कुटुंबियांशी एकनिष्ठ असल्यानं त्यांचं मन वळविण्यात यश येईल असं काँग्रेसला वाटतंय. त्यामुळे मुंबईतल्या काँग्रेसच्या ज्या 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती त्यांनाही आता आस्ते कदम घेण्याची सूचना देण्यात आलीये. त्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा