खडसेंच्या बदलींना मुख्यमंत्र्यांचा चाप, 110 अधिकार्‍यांच्या बदल्या रोखल्या

June 9, 2016 4:56 PM0 commentsViews:

khadse_file_cm09 जून : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घाई घाईने केलेल्या बदल्यांची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत पाठवलीये . खडसेंनी राजीनामा देण्याआधी तब्बल 110 डेप्युटी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली होती.

एमआयडीसी भूखंड प्रकरण, दाऊद कॉल प्रकरण, जावयाची लिमोझीन कार प्रकरण आणि कथीत पीए गजाजन पाटील लाच प्रकरणी एकनाथ खडसे यांनी पदावरून पायउतार व्हावं लागलं. आठवडाभर सुरू असलेल्या या वादात खडसेंनी घाईघाईने काही अधिकार्‍यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. सुमारे 110 डेप्युटी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्यांची फाईल खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देण्या पूर्वीच खडसेंनी या बदल्यांची शिफारस केली होती. पण नियमानुसार नागरी सेवा मंडळ मंजूर होऊन ही फाईल यायला हवी होती, पण खडसेंनी तसं न करता नागरी सेवा मंडळाला डावलून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी या फाईलींवर सही करण्यास नकार दिला आणि या फाईली नागरी सेवा मंडळाकडून तपासून पाठव्यात अशी सूचना केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा