नेव्ही ऑफीसरने केली पत्नी, मुलीची हत्या

March 30, 2010 3:04 PM0 commentsViews: 2

30 मार्चठाण्यात रिटायर्ड नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कर्जाच्या मुद्द्यावरुन हा वाद सुरू होता. गंभीर जखमी असलेल्या मुलीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ठाण्यातील ब्रम्हांड सोसायटीत ही घटना घडली. या रिटायर्ड ऑफिसरचे नाव राजेश कुमार आहे. सध्या तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करत आहे. याबाबत कासारवडवली पोलीस स्टेशनमधे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

close