राष्ट्रवादीच्या बैठकीत महिलांना डावललं जातंय, वंदना चव्हाणांचा आरोप

June 9, 2016 5:34 PM0 commentsViews:

पुणे – 09 जून :राष्ट्रवादी पक्षांतर्गंत बैठकीमध्ये महिलांना डावललं जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी पक्षालाच घरचा अहेर दिलाय. त्यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा महिलांना राजकारणात डावललं जात असल्याचा मुद्दा चर्चेत आलाय.vandana_chavan

पुणे पालिकेतल्या निधी वाटपाच्या वादाच्या निमित्ताने पुणे राष्ट्रवादीतला पक्षांतर्गंत वादही पुन्हा चव्हाट्यावर आलाय. पक्षाच्या शहर अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी त्यांच्याच पक्षाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या घरासमोर महिलांना घेऊन धरणे आंदोलन केलंय. तसंच नुकत्याच झालेल्या पक्षांतर्गंत बैठकीमध्ये महिलांना डावललं जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय.

पण हा सगळा पक्षांतर्गंत वाद स्थानिक पातळीवरच मिटवायला आम्ही महिला सक्षम असल्याचंही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. पण यानिमित्ताने महिलांना राजकारणात डावललं जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. म्हणूनच पक्षाध्यक्ष शरद पवार आता आपल्याच महिला खासदारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा