दिघावासियांनी मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार, तात्काळ घरं खाली करण्याचे आदेश

June 9, 2016 5:58 PM0 commentsViews:

digha_navimumbaiनवी मुंबई – 09 जून : नवी मुंबई जवळच्या दिघा इथल्या अनधिकृत बांधकामांना मुदतवाढ देण्याची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे दिघावासियांना आपली घरं तात्काळ रिकामी करावी लागणार आहेत.

दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी याचिकाकर्त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. तसंच राज्य सरकारनेही यासंदर्भातलं धोरण आणण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सतत अशी मुदतवाढ द्यायला हायकोर्टाने नकार दिला आहे. तसंच या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितलेला वेळ नाकारलेला आहे. दिघ्यातील 94 अनधिकृत इमारती पैकी 9 इमारती कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात होत्या. या 9 इमारतींना 31 मेपर्यंत न्यायालयाने संरक्षण दिलं होतं.

आता मुदत संपल्याने मोरेश्वर, पाडुरंग, कमलाकर आणि भगतजी या चार इमारती मधील रहिवाश्यांनी पावसाळा आणि सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र, कोर्टाने विनंती फेटाळत आजच्या आज इमारतीखाली करून एमआयडीसीच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले. आज पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने दोन दिवसानंतर एमआयडीसी या चार इमारती ताब्यात घेणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा