एक चूक तुम्हाला महागात पडेल, पाहा हा अपघातांचा थरार

June 9, 2016 7:16 PM0 commentsViews:

09 जून : हायवेवर अपघात होतात आणि आपण जबाबदार धरतो ते प्रशासनाला…मात्र त्याला प्रत्येकवेळी प्रशासनच जबाबदार असतं असं नाही. आम्ही काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. ते धक्कादायक आहे आणि आपल्या चुकामुळे किती मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते हे तुम्हाला या व्हिडिओवरून समजेल. आमची एवढीचं एक विनंती आहे की, वाहन चालवतांना रस्त्याचे नियम पाळा, रस्ता ओलांडताना असो किंवा चालवताना स्वता: काळजी घ्या आणि इतरांनाही सांगा.

accident_cctvपहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बाईक चालवतोय आणि हायवेवर युटर्न घेण्याची घाई करतो..तो विसरलाय की तो गाडी वेगानं आणि हायवेवर चालवतोय. त्यानं युटर्न घेण्यासाठी सिग्नलवर जायला हवंय पण त्याने तसं केलं नाही..दुसर्‍या बाजुनं येत असलेल्या इनोव्हानं त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि त्याची ही घाई त्याच्या जीवावर बेतली. मुंबईच्या पामबीच रोडवरचा हा अपघात घडला होता.

दुसर्‍या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जोडपं बाईकवरुन जातं होतं. हायवे जाताना त्यांना एका बाजूनं त्या बाजूला जायचं…पण त्यानं काळजी न घेता थेट मध्येच डाव्या बाजूला गाडी वळवली आणि त्याची चूक त्याला कशी भोवली. मागून येणार्‍या कारनं त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य जखमी झालं.

तिसर्‍या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरुन तुम्हाला कळेल. पाचजण रस्ता ओलांडत आहे. भरधाव वेगानं चालणार्‍या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात हे तुम्हाला दिसेल. तिघांना बरोबर रस्ता ओलांडला पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर बेतली. त्यांचा एक मित्र अचानक घाबरून मागे परतला त्याच्या मागे त्याचा मित्रही मागे पळला आणि भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्याला धडक दिली.

पाचव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणखी एक निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा अपघात कैद झाला. कारचालकांनं स्वत:चा संयम सोडला आणि रस्ता ओलांडायला सुरुवात केली. पण दुसर्‍या बाजूनं वेगानं येणार्‍या टॅब कॅबनं त्या कारला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कार दूर फेकली गेली. फक्त आपण गाडी चालवतोय पण रस्तांचे नियम बाजूला ठेवतो आणि होतो जीवाशी खेळ हेच या अपघातातून दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा