मोदींची तुलना दाऊदशी

March 30, 2010 3:27 PM0 commentsViews: 3

30 मार्चकाँग्रेसने आजही मोंदींवर हल्लासत्र सुरूच ठेवले. काँग्रेसने आज मोदींची तुलना दाऊद इब्राहीमशी केली. जर दाऊद इब्राहीम कायद्यापुढे शरण आला तर त्याने न्यायव्यवस्थेवर उपकार केले, असे भाजप म्हणेल काय ? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे.काँग्रेसच्या या आरोपांना नरेंद्र मोदींनी आपल्या ब्लॉगवरून प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसवर सरळ हल्ला करत ते लिहितात, ''गोध्रा प्रकरण किंवा त्यानंतरच्या घटना कोणत्याही भद्र समाजाच्या प्रतिष्ठेत भर घालत नाहीत. या दंगली माणुसकीला कलंक आहेत. यात दुमत आहे कुठे? काहीजण गुजरातला बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. माझ्या कळकळीच्या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.''

close