सानियाच्या लग्नाचे पाकिस्तानात फटाके

March 30, 2010 3:32 PM0 commentsViews: 5

30 मार्चभारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे लग्न होणार हे आता स्पष्ट झाले आहे.यासाठी तिला आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तानचा व्हिसाही मिळाला आहे. शोएब आणि त्याचे कुटुंब लाहोरमधील सियालकोट इथे राहते. येत्या महिन्याभरात सानिया आणि शोएब विवाहबद्ध होणार आहेत. मात्र लग्नाची तारीख अजून नक्की झालेली नाही. त्यांचे लग्न होण्यापूर्वीच लाहोरमध्ये सेलिब्रेशन करण्यात आले. सियालकोटमध्ये शोएबच्या घरासमोर फटाके वाजवण्यात आले. शोएब आणि सानियाच्या फॅन्सला आता प्रतीक्षा आहे ती त्यांच्या लग्नाच्या तारखेची.

close