पुण्यातल्या तिन्ही नद्यांना अनधिकृत बांधकामं आणि प्रदूषणाचा विळखा

June 10, 2016 2:00 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड
10 जून : इंद्रायणी काठी देवाची आळंदी… हे गाणं ऐकताना आपल्याला इंद्रायणी नदीची एक वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर असते. पण आता हीच इंद्रायणी, मुळा आणि पवना या नद्यांवर पिंपरी चिंचवड शहरानं अक्षरश: घाला घातला आहे.

Pimpri chinchavd

नद्यांच्या पात्रात राजरोसपणे टाकलेला हा भराव बघून मन सुन्न होतं. हा भराव टाकल्यामुळे पवनेचा मार्गच खुंटला आहे. मुळा आणि इंद्रायणीवरही अशाच पद्धतीने राडारोड्याचं अतिक्रमण आहे. नदीपात्रातल्या या भरावामुळे नदीला तर कोरड पडलीच आहे पण हे अतिक्रमण हटवण्याची मागणी करून नागरिकांच्याही घशाला कोरड पडली आहे.

नद्यांवर अभ्यास करणारे पर्यावरणवादी कार्यकर्तेही पुन्हा पुन्हा सांगतायत पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला ?

नदीपात्रात तर अतिक्रमण झालंच आहे पण नद्यांमध्ये भराव टाकून त्या राजरोसपणे बुजवल्या जात आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला हे माहीत नाही, असं अजिबात नाही. पण त्यांचं उत्तर काय आहे, बघा…

हवाई चित्रणातून कोणतीही नदी खरंतर सुंदर दिसायला हवी. पण आम्हाला ड्रोन कॅमेर्‍यातून दिसलं ते असं नद्यांचं विदारक चित्र. नद्यांमध्ये भराव टाकून, अतिक्रमणं करून या नद्या बुजवण्याचाच डाव आहे. नद्यांवर अतिक्रमणं करणार्‍यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत या नद्यांचा कोंडमारा होतच राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा