मनसेची पुन्हा विदेशी कलाकारांवर धाड

March 30, 2010 3:38 PM0 commentsViews: 1

30 मार्चआज मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अक्सा बिचवर एन्जल सिनेमाचे शूटिंग बंद पाडले. या सिनेमासाठी परदेशी ज्युनिअर आर्टिस्ट बेकायदेशीरपणे आल्याचा आरोप मनसेने केला आहे. गणेश आचार्य या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 10 ज्युनिअर आर्टिस्टना अटक केली. तसेच मनसेच्याही 12 जणांना अटक करण्यात आली. मनसेच्या फिल्म वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनाही अटक करण्यात आली. सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशी ज्युनिअर आर्टिस्ट बेकायदेशीरपणे भारतात येतात, असा आरोप मनसेने केला होता. तसेच मुंबईत ज्या ज्या ठिकाणी सिनेमांचे शूटिंग सुरू असेल, त्या त्या ठिकाणी जाऊन परदेशी कलाकारांबाबत माहिती घेतली जाईल, असे मनसेने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज मनसेने अक्सा बिचवर जाऊन सिनेमाचे शूटिंग बंद पाडले.

close