येत आहेत मोटोचे धमाकेदार फोन

June 10, 2016 4:00 PM0 commentsViews:

स्मार्टफोन म्हटल्यावर तो तसा असायला हवा…जसं की तो संपूर्ण फिचर आणि दमदार असाच हवाय. मोटोने या पुढे एक पाऊल टाकत स्मार्टफोनला एक नवं रूप दिलंय. मोटोने moto z आणि moto z force हे दोन नवे धमाकेदार असे फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही फोन मॉड्युलर स्मार्टफोन असणार आहे. या दोन्ही फोनचे वैशिष्टय म्हणजे तुम्ही या फोनमध्ये एक्स्टरा स्पिकर लावू शकता, प्रोजेक्टर लावू शकता,एवढंच नाहीतर बॅटरी जर संपली तर याच फोनला तुम्ही स्मार्ट अशी बॅटरीही वापरू शकता…अगदी ऑल इन वन असाच हा फोन आहे. बरं हे झालं फोनच्या फिचरबद्दल…या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लष्करी विमानांना बनवण्यासाठी जे ऍल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील वापरले जाते त्यापासून हा फोन बनवण्यात आला आहे. त्यामुळे जर हा तुमच्या हातातून पडला तर बेफिकर राहा याला काहीही होणार नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मोटो झेड फोर्सची बॅटरी ही तब्बल 40 तासांपर्यंत चालेल असा दावा कंपनीने केलाय. सप्टेंबरच्या सुरुवातीला हा फोन बाजारात उपलब्ध होणार आहे.

कसा आहे moto z

 • बॅटरी : 2600(एमएएच)
 • स्क्रीन साईज : 5.50(इंच)
 • रॅम     : 4 जीबी
 • इंटरनल स्टोरेज : 32 जीबी
 • एक्सपेंडेबल स्टोरेज : माइक्रोएसडी 2 टीबीपर्यंत
 • रियर कॅमेरा     : 13 मेगापिक्सल
 • फ्रंट कॅमेरा     : 5 मेगापिक्सल

कसा आहे moto z force

 • बॅटरी : 3500(एमएएच)
 • स्क्रीन साईज : 5.50(इंच)
 • रॅम     : 4 जीबी
 • इंटरनल स्टोरेज : 32 जीबी
 • एक्सपेंडेबल स्टोरेज : माइक्रोएसडी 2 टीबीपर्यंत
 • रियर कॅमेरा     : 21 मेगापिक्सल
 • फ्रंट कॅमेरा     : 5 मेगापिक्सल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा