दिघा प्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचे पद जाण्याची शक्यता

June 10, 2016 4:43 PM0 commentsViews:

digha_navimumbaiनवी मुंबई – 10 जून : दिघा अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांना दोषी ठरवलंय. त्यामुळे आता या नगरसेवकांचं पद जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नविन गवते, अपर्णा गवते आणि दिपा गवते यांचं नगरसेवक रद्द करण्याबाबत आयुक्त तुकाराम मुंडे निर्णय घेणार आहे. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय देणार आहे. या तिन्ही नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले तर माञ राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे नक्की.

दरम्यान, रहिवाश्यांनी कोर्टाकडे पावसाळ्यापर्यंत मुदतवाढ मागितली होती. पण हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं की, कोणतीही मुदतवाढ देता येणार नाही. पावसाळ्यानंतर घर सोडू असं प्रतिज्ञापत्र जर तुम्ही सादर केलं तर तुम्हाला मुदतवाढ दिली जाईल. पण मग तुम्हाला राज्य शासनाची घर कायम करण्याची योजना लागू होणार नाही. यामुळे रहिवासी दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडले आहेत. आम्ही आता कुठे जायचं, 10 हजार मिळकत असलेल्यांनी आता 15 हजार रुपये घरभाडं भरायचं का ?, अशी व्यथा रहिवाशांनी मांडलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा