मोदी नागोबा-चुरण बाबा, सेना-भाजपमध्ये पोस्टर्स वॉर भडकलं

June 10, 2016 8:49 PM0 commentsViews:

मुंबई – 10 जून : भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या सोशल मीडियावर पोस्टर्स वॉर भडकलंय. भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करणारे पोस्टर प्रसिद्ध केले. त्यानंतर शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवणारे पोस्टर्स प्रसिद्ध केलेत. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांना आयत्या बिळात नागोबा म्हणून हिणवलंय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ‘निजामाचं सरकार’ उपमा दिल्यामुळे भाजपने तीव्र आक्षेप घेतलाय. सेनेला रस्त्यावर उत्तर देऊ असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केलाय. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर यावादावर तोंडसुख घेतलं जात आहे. ‘आपल्या महाराष्ट्रतला हा पप्पू काही ही बोलतो’, ‘देश मातोश्री आणि पिताश्रीच्या आशीर्वादावर चालत नाही’ अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर होत होते. या पोस्टर्सवर ‘आय सपोर्ट नमो’ असं लिहण्यात आलं होतं

. हे पोस्टर्स झळकल्यानंतर आज भाजपची खिल्ली उडवणारे पोस्टर्स झळकत आहे. मोदींना चुरण बाबा हिणवत “विदेशात खूप झालं जरा देशात बघा”,”आयत्या बिळात नागोबा शिवसेनेच्या जोरावर आजवर पसरलात ‘गद्दार’ आमचे उपकार विसरला”,”अच्छे-बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला घाई नाही”अशा आशयाचे पोस्टर्स सोशलमीडियावर शेअर केले जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकी आधीच शिवसेना विरुद्ध भाजप पोस्टर्स वॉरवरुन झालेला वाद सोशल मीडियात चांगलाच रंगलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा