काँग्रेसने आघाडी तोडली नसती तर आज ही वेळ आली नसती -शरद पवार

June 10, 2016 10:39 PM0 commentsViews:

मुंबई – 10 जून : मागील निवडणुकीत काँग्रेसने आघाडी तोडली, जर काँग्रेससोबत आमची आघाडी झाली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलीये. तसंच यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरलंय. मात्र,पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांचा दावा फेटाळून लावलाय.

35pawar_cm_ncpराष्ट्रवादी काँग्रेसचा आज 17 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. त्यानिमित्त मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी सत्तेपासून आपण दुरावल्याचं खापर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला न सांगता काँग्रेसची यादी जाहीर केली, त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांत कळवतो असं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला अंधारात ठेवलं, असा आरोप करत पवारांनी घडलेल्या गोष्टीची कबुली दिली. त्यामुळे आम्ही वेगळे लढलो अशी स्पष्ट कबुली आज शरद पवार यांनी दिली आहे.

आम्ही एकत्र लढलो असतो तर हे सरकार आज सत्तेत दिसलं नसतं अशी कोपरखळीही पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मारली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना पवारांचा दावा खोडून काढला.

शरद पवार खोटं बोलत आहेत. आघाडीचा हा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे. या मोठ्या नेत्यांनी बोललेलं किती खरं किती खोट हे जनतेनं ठरवावं असा पलटवार पृथ्वीराज चव्हाणांनी केला. तसंच 2009 ला जागेची वाटणी 114 आणि 84 अशी होती. तरी आम्ही 10 सीट वाढवायला तयार होतो. 2004 आणि 2009 च्या फॉर्म्युल्यानुसार असं ठरलेलं होतं. राष्ट्रवादीकडून 50 टक्के जागा मागणं व्यावहारीक नव्हतं.आम्ही यादी जाहीर केली हे संपूर्णत: चुकीच आहे. ज्या क्षणाला शिवसेना-भाजप युती तुटली अर्ध्यासातातचं आघाडी तुटली असं चव्हाण म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा