राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळले रंग

March 31, 2010 10:02 AM0 commentsViews: 3

31 मार्चलावणी नृत्याचा जाहीर कार्यक्रम…कार्यक्रम रंगात आला आहे…नृत्यांगनेच्या अदांनी रसिक घायाळ होत आहेत…अशा वेळी न राहवून एक प्रतिष्ठीत नेते स्टेजवर येतात आणि या नृत्यांगनेसोबत धमाल नृत्य करू लागतात…स्टेजसमोर विद्यार्थी, अंगणवाडी सेविका बसलेले आहेत, हेही भान त्यांना राहिले नाही. असे जाहीर रंग उधळणार्‍या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचे नाव आहे, वसंत मानकुमरे. ते माजी शिक्षण सभापतीही आहेत. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे मानकुमरे यांना याबद्दल काहीही खेद वगैरे वाटत नाही. उलट आपल्या नेत्याचा अशा पद्धतीने 'जोशात' वाढदिवस साजरा करण्याचा आपल्याला अधिकारच आहे, असे मानकुमरे यांनी म्हटले आहे. आपण स्वत: लेखक, नाटककार आहोत. त्यामुळे अशी 'कला' सादर करण्याचा माझा हक्कच आहे, असेही ते म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मस्तवाल कार्यकर्त्यांचा हा उच्छाद आहे. जनता महागाईने त्रस्त झाली असताना हे नेते पैशांची उधळपट्टी करत आहेत, अशी टीका भाजपचे सातारा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

close