‘ईट का जबाव पत्थर से देंगे’, पर्रिकरांनी पाकला सुनावलं

June 11, 2016 2:17 PM0 commentsViews:

manohar parrikar11 जून : भारताला नुकसान पोहचवणे पाकिस्तानला जन्मसिद्ध हक्क वाटत असेल पण आम्हीही ‘ईट का जबाव पत्थर से देंगे’ असे खडेबोल देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकला सुनावले.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला चांगलंच फटकारलं. भारताला नुकसान पोहचवणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं पाकिस्तानला वाटतं, आणि म्हणून ते अशा कारवाया करत असतात असा टोला पर्रिकर यांनी लगावला. तसंच युक्तिवादासाठी मी समजू शकतो की ते काश्मीरवर दावा करतात. मग त्यांनी 2008 साली मुंबईवर हल्ला का केला, हे मला समजत नाही. पण ‘हम ईट का जबाव पत्थर से देंगे’, असा सज्जड इशाराही पर्रिकरांनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा