दुष्काळग्रस्त माण तालुक्यात हरित चळवळ, सयाजी शिंदेंनी आईंची केली बीजतुला

June 11, 2016 3:25 PM0 commentsViews:

 
sayaji_shindeसातारा – 11 जून : सतत दुष्काळाचा सामना करावा लागणार्‍या माण तालुक्यात आज एका अभिनव प्रयोगाची सुरुवात होणार आहे. आयबीएन लोकमतच्या पाणी परिषदमध्ये पाणीदार माणसं या पुरस्कारनं सन्मानित केलेल्या पुरस्काथीर्ंच्या हस्ते आज दिवडी या गावात वृक्षारोपण महाअभियानास सुरुवात होणार आहे.

या अभियानचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे आपल्या आईची बिजतुला करुन बीजारोपण करणार आहेत. सोबतच 8 हजार देशी झाड लावण्यात येणार आहेत. यावेळी आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे, पाणीदार माणस पुरस्कार्थी विनायकराव पाटील, अनिल मोहिते, प्राजक्ता जगताप आदींच्या हस्ते कोलवाडी-पांढरवाड़ी-गोडसेवाड़ी या तीन गावांच्या मध्यभागी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा