26/11 च्यावेळी भारतीय अधिकारी पाकमध्ये घेत होते पाहुणचार?

June 11, 2016 5:27 PM0 commentsViews:

दिल्ली – 11 जून : मुंबईवर 26/11 हल्ला झाला होतो तेव्हा गृह मंत्रालयातील अधिकारी पाकिस्तानमध्ये पाहुणचार घेत होते अशी धक्कादायक माहिती समोर आलीये. मुंबईवर हल्ल्याच्या एक दिवसाआधी भारत आणि पाकमध्ये गृह सचिव स्तरावरची चर्चा झाली होती. भारतीय अधिकारी परत निघाले होते पण पाकच्या आग्रहामुळे एक दिवस आणखी मुक्काम वाढवला होता.

26 11 attack_new york26/11 हल्ल्याच्याआधी जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील गृह सचिव स्तरावर चर्चा झाली होती. भारताच्या वतीने तत्कालीन गृहसचिव मधुकर गुप्ता, अतिरिक्त गृहसचिव अन्वर अहसान अहमद आणि संयुक्त सचिव दीप्तीविलास यांच्यासह अन्य काही अधिकारी उपस्थित होते. पाक सरकारने या गृह सचिव अधिकार्‍यांची निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या मरी इथं राहण्याची व्यवस्था केली होती. आणि दुसरीकडे भारतात मुंबईमध्ये दहशतवादी आपल्या कारवाया करत होते. त्यामुळे अशा परिस्थिती भारतीय अधिकारी भारतात का परतले नाही असा प्रश्न उपस्थिती झालाय. या प्रकरणाच्या खुलाशानंतर तत्कालीन गृह सहसचिव आरव्हीएस मणी यांनी याला दुजोरा दिलाय. हे अधिकारी पाकिस्तानमध्ये थांबल्यामुळे रणनिती आखण्यास अडचणी येत होत्या असंही मणी यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा