शेतकर्‍यांनी पाडले सेझचे काम बंद

March 31, 2010 10:14 AM0 commentsViews: 2

31 मार्चनाशिकमधील सेझचे काम गुळवंच येथील शेतकर्‍यांनी बंद पाडले आहे. सरकारने भूसंपादन करताना दिलेली आश्वासने पाळली नसल्याची तक्रार या शेतकर्‍यांनी केली आहे.प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना 15 टक्क्यांचा भूखंड आणि कुटुंबातील्य एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. पण प्रत्यक्षात त्यातील काहीच उतरले नसल्याने शेतकर्‍यांनी हे आंदोलन सुरू केले. या ठिकाणी होणार्‍या औष्णिक विद्युत केंद्राबद्दल पूर्णत: अंधारात ठेवल्याचाही आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

close