दाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

June 11, 2016 6:38 PM0 commentsViews:

virendra_tawdeपुणे – 11 जून : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पहिली अटक करण्यात आलीय. अटकेत असलेल्या विरेंद्र तावडेला शिवाजीनगर कोर्टाने 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दाभोलकर हत्येप्रकरणी तब्बल साडे तीन वर्षांनंतर अटक करण्यात सीबीआयला यश मिळालं. हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्त्या विरेंद्र तावडेला चौकशी अंती शुक्रवारी रात्री मुंबईतून अटक करण्यात आली. आज त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी सारंग अकोलकर आणि विरेंद्र तावडे यांच्यात इमेलच्यामार्फत जी माहिती दिली गेली त्यांचा तपास आणि दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्यानं विरेंद्र तावडेंना इतर हत्येविषयी माहिती आहे का याचाही तपास करायचा आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल आणि वाहन आम्हाला मिळवायचं आहे. याकरता सात दिवसांची कोठडी द्या अशी मागणी सीबीआयनं कोर्टात केली होती. तर सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी युक्तीवाद केला. विरेंद्र तावडेची दोन दिवस पुरेसे असल्याचा युक्तीवाद पुनाळेकर यांनी केला. कोर्टाने दोन्ही बाजूने ऐकून घेत तावडेला 16 जूनपर्यंत कोठडी दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा