आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुखी – लिव्ह इन मध्ये रहाणार्‍या जोडप्यांची प्रतिक्रिया

October 13, 2008 10:31 AM0 commentsViews: 27

13 सप्टेंबर, मुंबई – लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर परवानगी देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिलीय. पण काँग्रेसमधून कृपाशंकर सिंग यांनीच या कायद्याला विरोध केलाय. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्याला परवानगी दिली तर द्विभार्या प्रतिबंधक आणि वारसा हक्क या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल का, असेही प्रश्न उपस्थित झालेत. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍यांना काय वाटतं… हे आयबीएन लोकमतने जाणून घेतलं.बॉम्बे आर्ट सोसायटीचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध शिल्पकार उत्तम पाचरणे 1984 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. लग्न करायची त्यांना कधी गरजच पडली नाही. ' मी लग्न करेपर्यंत आम्हाला मुलं झाली आणि मग लग्न करायचं खर तर आम्ही विसरूनच गेलो म्हणा ' , असं उत्तम पाचरणे यांनी सांगितलं.ज्योती आणि उत्तम आज मालाडच्या फ्लॅटमध्ये सुखी संसार करत असले तरी इथपर्यंतचा सगळा प्रवास अनेक अडचणींचा होता. ' कधीकधी भीती वाटायची की हिच्या घरचे हिला येउन घेउन जातील, पण सुदैवाने तसं काही झालं नाही ' , असं उत्तम पाचारणे म्हणाले.सहजीवन लग्नाशिवायचं, ही संकल्पना जगात नक्की कुठे आणि कधी सुरू झाली यावर बोलताना समाजशास्त्रज्ञ डॉ. कमला गणेश म्हणाल्या, ' युरोप आणि अमेरिकेत याची सुरुवात झाली. दुसर्‍या महायुध्दानंतर 1960 च्या शेवटी शेवटी बर्‍याच सामाजिक चळवळी सुरू झाल्या. जाचक सामाजिक बंधनं या लोकांनी नाकारली आणि व्यक्तिस्वातंत्रयाला महत्व दिलं गेलं. त्यातून या नात्याची सुरुवात झाली. तिकडे हे सगळं आतात नॉर्मल समजलं जातं. 'पाचरणेंसारखे अनेकजण भारतातही लीव्ह इन रिलेशनमध्य राहत आहेत. पण याबद्दलची खुली चर्चा आत्ता सुरू झाली आहे. 25 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या शिल्पकार उत्तम पाचरणे आणि ज्योती यांनी लिव्ह इन रिलेशनशिपसाठी येणार्‍या कायद्याचं स्वागत केलं आहे. पण त्याचबरोबर ' कायद्यात दोन्ही बाजू विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत. फसवणूक झालेल्या बाईला न्याय मिळेल, पण कुणी बाई एखादा वर्ष राहून पैशासाठी ब्लॅकमेल करणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे ' , असं ते म्हणाले.या बातमीचा व्हिडियो पहाण्यासाठी सोबतच्या आयकॉनवर क्लिक करा.

close